आकाशात सूर्य आला आहे,
वातावरणात एक नवा रंग आला आहे,
फक्त हसा, असे गप्प राहू नकोस,
फक्त तुझं हसू पाहण्यासाठी तर,
ही सुंदर सकाळ आली आहे. सुप्रभात
तुझ्या आयुष्यात कधीच दुःख येऊ नये,
तुझे डोळे कधीही अश्रूंनी ओले होऊ नयेत,
आपणास आयुष्यातील सर्व सुख मिळो,
जरी आम्ही त्या आनंदात नसलो तरीही.
सुप्रभात!
हे ‘सकाळ’ तू येशील तेव्हा,
प्रत्येकासाठी “आनंद” आण,
प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू सजव,
प्रत्येक अंगणात फुले उमलव.
सुप्रभात!
सूर्य उगवण्याची वेळ आली आहे,
फुले उमलण्याची वेळ आली आहे,
माझ्या मित्रा तुझ्या गोड झोपेतून उठ,
स्वप्ने प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली आहे.
सुप्रभात!
सूर्या, त्यांना माझा निरोप दे.
आनंदाचा दिवस आणि हास्याची संध्याकाळ दे,
जेव्हा ते माझा हा संदेश प्रेमाने वाचेल,
तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर गोड हसू दे. सुप्रभात
Good Morning Good Day
फुल बनुन हसत राहणे हेच जीवन आहे.
हसता हसता दु:ख विसरून जाणे हेच जीवन आहे.
भेटुन तर सर्वजण आंनदी होतात.
पण न भेटता नाती जपणं हेच खर जीवन आहे.
गुड मॉर्निंग
प्रेम म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी जीवनाची वाट..
आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं
सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न..
गुड मॉर्निंग
आहात तुम्ही ‘सावरायला’
म्हणुन ‘पडायला’ आवडते,
आहात तुम्ही ‘हसवायला’
म्हणुन ‘रडायला’ आवडते,
आहात तुम्ही ‘समजवायला’
म्हणुन ‘चुकायला’ आवडते,
माझ्या आयुष्यात आहेत
तुमच्यासारखे “सगळे “
म्हणुन
मला “जगायला” आवडत!!!!!
गुड मॉर्निंग
“दिव्याने दिवा लावत गेल कि
दिव्यांची एक “दिप माळ” तयार होते,
फुलाला फूल जोडत गेलं कि
फुलांचा एक “फुलहार” तयार होतो..
आणि माणसाला माणूस जोडत गेलं की
“माणुसकीचं” एक सुंदर नातं तयार होतं…
गुड मॉर्निंग
सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात
नाजुक ऊन्हाची प्रेमळ साद
मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल
रोज तुमच्या आयुष्यात येऊ दे सुंदर सकाळ…
गुड मॉर्निंग
गुड मॉर्निंग
रात्र संपली, सकाळ झाली.
इवली पाखरे किलबिलू लागली.
सुर्याने अंगावरची चादर काढली.
चंद्राची ड्युटी संपली
उठा आता सकाळ झाली!
तुमच्या डोळ्यांना जागविले आहे आम्ही,
गुड मॉर्निंग ची फरज निभावली आहे आम्ही,
नका समजू की झोपलेलो आहे आम्ही,
आज तुमच्या आधी तुमची आठवण केली आहे आम्ही.
गुड मॉर्निंग
जगणे आता उत्सव व्हावे,
क्षण क्षण हे भरभरून जगावे,
पैसाअडका या हीं पेक्षा,
फक्त आनंद हेच ध्येय असावे,
तो रुसला का? ती फुगली का ?
तिथल्या तिथेच सोडून द्यावे,
सॉरीची ती कुबडी घेऊन,
नात्याला त्या उचलून घ्यावे,
कुणी वागला कसे जरीही,
देवाला न्यायाधीश करावे,
सोडुन दयावे दुखरे क्षण अन,
जगणे हे आनंदी करावे
गुड मॉर्निंग